Wadhwan Port : प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात स्थानिकांचा एल्गार, मोठ्या संख्येने स्थानिकांचा मंत्रालयावर मोर्चा

Wadhwan Port : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. यासाठी स्थानिकांकडून प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.

Wadhwan Port Protest

1/13
पालघर ( Palghar ) जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात आज स्थानिक नागरिक मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढला आहे.
2/13
प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. हा विरोध तीव्र करण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं आज मोर्चाचं आयोजन केलं आहे.
3/13
प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात संघर्ष समितीनं मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यानंतर मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
4/13
केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील या आंदोलनासाठी डहाणू, पालघर भागातील शेकडो कार्यकर्ते रेल्वे लोकलमधून सकाळीच मुंबईकडे रवाना झाले होते.
5/13
सुमारे 25 हजार कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
6/13
प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे.
7/13
वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा आज केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
8/13
पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात आज स्थानिक नागरिक मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत.
9/13
त्यासाठी हजारो नागरिक मुंबईतल्या आझाद मैदानात एकत्र आलेत.
10/13
पहाटेच रेल्वेतून डहाणू पालघर भागातून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले होते.
11/13
प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात हजारो नागरिक मुंबईतल्या आझाद मैदानात एकत्र जमले आहे.
12/13
हजारोंच्या संख्येने स्थानिक मंत्रालयावर धडकणार आहेत.
13/13
वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Sponsored Links by Taboola