Kolhapur Football : नाद खुळा पिवळा निळा! कतारमध्ये कोल्हापूरच्या पीटीएमचा झेंडा झळकला
फुटबाॅल वर्ल्डकप कतारमध्ये सुरु असला, तरी चर्चा मात्र फुटबाॅल पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरची सर्वाधिक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकतारच्या मैदानात आता कोल्हापूरच्या पाटाकडील तालीम मंडळाचा झेंडा झळकला आहे.
यापूर्वी शिवाजी तरुण मंडळाचा झेंडाही झळकला होता.
फुटबाॅल सुरु झाल्यापासून कटआऊट, बॅनर लावण्याची ईर्ष्याच कोल्हापुरात सुरु आहे.
कोल्हापूरच्या गल्लीबोळात मेस्सी, रोनाल्डो आणि नेमारचे बॅनर झळकले आहेत.
भिंतीही फुटबाॅलपटूच्या फोटोनी रंगून गेल्या आहेत.
कोल्हापूरमध्ये मेस्सी आणि रोनाल्डोचे जबरदस्त फॅन आहेत.
सायबर चौकात लावण्यात आलेल्या कटआऊटने आणि त्याच्या कॅप्शनने चांगलेच लक्ष वेधले आहे.
मंगळवार पेठेतील गुलाब गल्लीत सर्व सहभागी देशांचे पताका लावण्यात आले आहेत.
प्रत्येक तालीम तसेच मंडळांकडून पोस्टर्स लावण्यात आली आहेत.