IPL 2023 : रहाणेनंतर रिद्धिमान साहाचं टीम इंडियामध्ये कमबॅक? आयपीएलमध्ये दमदार खेळी
आयपीएलच्या (IPL 2023) 51 व्या सामन्यात गुजरातचा यष्टीरक्षक आणि फलंदाज रिद्धिमान साहाचा (Wriddhiman Saha) दमदार फॉर्म पाहायला मिळाला. रिद्धिमानच्या तुफान अर्धशतकी खेळीनं सर्वांचंच लक्ष वेधलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाहाने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 43 चेंडूत 81 धावांची उत्कृष्ट खेळी केली. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले.
लखनौ विरुद्धच्या सामन्याच रिद्धिमान साहाने वायूवेगाने धावा जमवल्या आणि गुजरात टायटन्सचा सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला.
विराट कोहलीनेही साहाच्या या खेळीचे कौतुक केलं आहे. रिद्धिमानचा हा दमदार फॉर्म पाहता अजिंक्य रहाणेप्रमाणेच साहाचीही टीम इंडियात पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. याआधी टीम इंडियावर टांगती तलवार आहे. टीम इंडियामागे दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. अनेक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला 1 मे रोजी इकाना स्टेडियमवरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधातील सामन्यादरम्यान जखमी झाली. त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे.
यानंतर राहुल आयपीएल 2023 मधून बाहेर पडला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दुखापतीमुळे केएल राहुलला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीलाही मुकावं लागणार आहे.
लंडनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC चा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. मात्र, केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून बाहेर पडल्यास त्याच्या जागी साहाला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
साहा हा अनुभवी फलंदाज असून तो यष्टिरक्षणातही सक्षम आहे. WTC संघात केएस भरतचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे, पण साहाचा दमदार फॉर्म लक्षात घेता त्याला प्राधान्य दिलं जाऊ शकते.
आयपीएल 2023 मध्ये रिद्धिमान साहाने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 11 डावात 27.30 च्या सरासरीने आणि 137.18 च्या स्ट्राईक रेटने 273 धावा केल्या. त्यानं अर्धशतकही झळकावलं आहे.