Kolhapur News: कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी दानाचा ओघ, भक्तांकडून 47 तोळे सोन्याचा मुकूट अर्पण
कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी 47 तोळे सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना येथील एका आध्यात्मिक संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी हा मुकूट अर्पण केल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनी दिली.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जालन्यातील एका भक्ताने दीड कोटी रुपयांचे दागिने अंबाबाई चरणी दान म्हणून दिले होते
तर कोलकाता येथील एका भक्ताने 32 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकूट अर्पण केला होता.
त्यानंतर आता 47 तोळे सोन्याचा दुसरा मुकूट देवस्थानच्या खजिन्यात जमा झाला आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर संस्थानने ही माहिती दिली.
पुजारी आणि पाच ते सहा पदाधिकाऱ्यांनी हे गुप्तदान शुक्रवारी दुपारी स्वतः येऊन देवीला अर्पण केले.
या मुकुटाची किंमत 24 लाख रुपये असून देवस्थान समिती कार्यालयात व्यवस्थापकांकडे हा मुकूट सुपूर्द करण्यात आला.
शनिवारी अलंकार पूजेला देवीला हा मुकूट चढविण्यात आल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली.
करवीर निवासिनी श्रीअंबाबाईच्या खजिन्यात सातत्याने भाविकांकडून सोने आणि चांदीच्या दागिने अर्पण केले जाते .
खजिन्यात सुमारे शंभर किलोहून अधिक सोने आणि चांदी आहे.