Sangli Unseasonal Rain : सांगलीत वादळी वाऱ्यासह पाऊस, कडेगावमध्ये पत्र्याचे शेड उडल्याने 13 मजूर जखमी

अवकाळी पावसाने सांगली शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले. वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बेदाणा उत्पादक आणि आंबा उत्पादक शेतकरी हवालादिल झाला आहे.

या अवकाळी पावसाने कडेगाव येथे दाणादाण उडवली आहे. वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड उडून गेल्याने, यामध्ये 13 मजूर जखमी झाले आहेत. यामुळे सुमारे 35 लाखांचे नुकसान झाले आहे.
सायंकाळच्या सुमारास कडेगाव शहरामध्ये विजांच्या कडकटासह अवकाळी पाऊस सुरु झाला
तसेच प्रचंड वादळी वारा आला, ज्यामध्ये कडेगाव शहरातले मजुरांचे एक भले मोठे पत्र्याचे शेड उडून गेले आहे.
पीक काढण्यासाठी आलेल्या मजुरांना राहण्यासाठी हे पत्र्याचे शेड उभारण्यात आलं होतं, सुमारे 45 मजूर आपले संसार उपयोगी याठिकाणी साहित्य घेऊन राहत होते.
या वादळी वाऱ्यामुळे हे संपूर्ण शेड उडून गेले. यावेळी पत्रे उडून 13 मजूर किरकोळ स्वरुपात जखमी झाले आहेत
तसेच त्यांच्या साहित्याचं देखील मोठ्या नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर हे पत्रे उडून आसपासच्या वाहनांच्यावर जाऊन देखील आदळले. परिणामी काही वाहनांचा देखील किरकोळ स्वरुपात नुकसान झाले आहे.