Amelia Kerr MI : भारतीय चाहत्यांची नवीन 'इंटरनॅशनल क्रश', WPLच्या पहिल्याच मॅचमध्ये 'या' खेळाडूवर खिळल्या नजरा, कोण आहे अमेलिया केर?
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाला शानदार सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना जिंकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यात खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. दरम्यान जेवढी चर्चा सध्या WPL ची आहे, त्याहूनही अधिक चर्चा एका महिला खेळाडूच्या सौंदर्याची आहे.
भारतीय चाहत्यांची नवीन इंटरनॅशनल क्रश मिळाली आहे. सध्या WPL मधील न्यूझीलंडच्या खेळाडूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
WPl च्या पहिल्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात एका आंतरराष्ट्रीय खेळाडूनं भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे.
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने गुजरात जायंट्स संघावर 143 धावांचा दिमाखदार विजय मिळवला. या सामन्यात अनेक खेळाडूंनी तुफान खेळी केली. यादरम्यान क्रिकेट फॅन्समध्ये मुंबईच्या संघातून खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूची चर्चा आहे.
क्रिकेट चाहत्यांना त्यांची नवी क्रश मिळाली आहे. सध्या सोशल मीडियावर महिला क्रिकेटपटू अमेलिया केर (Amelia Kerr) हीची खूप चर्चा आहे. तिच्या निरागस सौंदर्यानं अनेकांना भुरळ घातली आहे.
WPL मुळे क्रिकेटप्रेमींना त्यांची नवीन क्रश सापडली आहे. मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू अमेलिया केर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. कोण आहे अमेलिया केर जाणून घ्या.
अमेलिया केर न्यूझीलंडची क्रिकेटपटू आहे. अमेलिया 22 वर्षांची आहे. अमेलियाने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं
यावेळी अमेलिया फक्त 16 वर्षांची होती. अमेलिया केर महिलांच्या क्रिकेट संघातील ऑल राऊंडर खेळाडूंपैकी एक आहे.
अवघ्या 22 वर्षीय न्यूझीलंडची क्रिकेटपटू अमेलिया केरच्या नावे विक्रम आहे. महिला एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठा डाव खेळण्याचा विक्रम अमेलिया केरच्या नावे आहे. तिने यावेळी दुहेरी शतक ठोकलं होतं.