Success story : दूध उत्पादनातून आर्थिक समृद्धी, हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर मांडगेंची यशोगाथा
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शेतकऱ्यानं दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणली आहे. तीन एकर शेती आणि एका म्हशीपासून सुरु केलेला व्यवसाय आता विस्तारला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोली जिल्ह्यातील बेलवाडी येथील रामेश्वर मांडगे शेतकऱ्याने दुध व्यवसायातून 100 एकर शेती घेतली आहे. तसेच त्यांच्याकडे आज 100 म्हशी आहेत.
शेतकरी रामेश्वर मांडगे यांच्याकडे मुरा आणि जाफराबादी प्रजातीच्या 100 म्हशी आहेत. म्हशी जास्त म्हणल्यावर त्यांना चाराही जास्त लागणार. दरवर्षी शेतकरी रामेश्वर मांडगे स्वतः कडे असलेल्या 60 ते 70 एकर शेत जमिनीवर वर्षभर पुरेल एवढ्या चाऱ्याची लागवड करतात.
म्हशींना दररोज लागवड केलेल्या चाऱ्यापैकी दोन ट्रॉल्या चारा दिला जातो. त्याचबरोबर या चाऱ्यासोबत हरभरा, ज्वारी, करडई, मका हे धान्य भरडून दररोज सरकी पेंडीचा खुराक एकत्र करुन म्हशींना दिला जातो.
म्हशींसाठी शेतकरी मांडगे यांनी दोन प्रकारचे गोठे बांधले आहेत. एक बंदिस्त प्रकारचा गोठा आणि दुसरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अध्यायावत केलेला एक गोठा आहे. या दोन्ही गोठ्यात या म्हशींचं व्यवस्थापन केलं जातं.
100 म्हशींच्या व्यवस्थापनासाठी दररोज याठिकाणी पाच ते सहा कामगार राबतात. या म्हशींच्या व्यवस्थापनासाठी हे कामगार दररोज सकाळी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत राबतात.
म्हशीपासून दररोज 350 ते 400 लिटर दूध निघते. हे दूध कामगार आणि मांडगे स्वतः घरोघरी विकतात
सकाळी दूध काढल्यानंतर या म्हशींना बंदिस्त गोठ्यामध्ये नेलं जातं. दुपारच्या वेळी उन्हाच्या फटक्यापासून म्हशींचा बचाव व्हावा यासाठी शेतकरी मांडगे यांनी खास स्विमिंग पूल बांधला आहे.