Virat Kohli in IPL : कोहलीची आयपीएलमधील 'विराट' कामगिरी! शतकांचा षटकार, ख्रिस गेलची बरोबरी
हैदराबादविरोधात विराट कोहलीने शतकी खेळी केली. विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील पहिले तर आयपीएलमधील सहावे शतक झळकावले. या शतकासह विराट कोहलीने युनिवर्स बॉस ख्रिस गेलची बरोबरी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या नावावर प्रत्येकी सहा सहा शतकांची नोंद आहे. विराट कोहली याने 63 चेंडूत शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या शतकीखेळीनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
2019 नंतर आयपीएलमध्ये विराट कोहलीचे पहिलेच शतक आहे. त्याशिवाय धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने दुसऱ्यांदा शतक झळकावण्याचा पराक्रम केलाय.
सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विराट कोहली आणि गेल संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. तर जोस बटलर पाच शतकासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील आपले पहिले शतक झळकावले. याआधी इतर फलंदाजांनी सहा शतके झळकावली आहेत. यामध्ये दोन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे
दोन्ही खेळाडू हैदराबादचे आहेत. हॅरी ब्रूक आणि हेनरिक क्लासेन यांनी हैदराबादसाठी शतकी खेळी केली. विशेष म्हणजे, हेनरिक क्लासेन याने आजच्या (आरसीबीविरोधात) सामन्यात शतक झळकावले होते.
व्यंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली... या भारतीय खेळाडूंनी यंदा शतके झळकावली आहेत. एका हंगामात सात शतके होण्याची पहिलीच वेळ आहे.
आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने हैदराबादविरोधात झंझावाती फलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासून विराट कोहलीने तुफानी फटकेबाजी केली. विराट कोहलीने हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला.
विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने चार षटकार आणि 12 चौकार लगावले. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 172 धावांची भागिदारी केली.
विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले. विराट कोहलीचे आयपीएलमधील सहावे शतक आहे.
विराट कोहली याने त्याचा जुना सहकारी ख्रिस गेल याची बरोबरी केली आहे. ख्रिस गेल याच्या सहा शतकाची बरोबरी विराट कोहलीने केली आहे. विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या नावावर आता सर्वाधिक शतकांची नोंद आहे.