Wardha: तापमान वाढीचा कहर! वर्ध्यातील करूणाश्रमातील प्राण्यांसाठी वॉटर कुलरची सोय
वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे सर्वांच्या अंगाची लाही लाही होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउष्माघाताचा त्रास वाढवू लागल्याने सरकारपातळीवर विविध निर्णय घेतले जात आहेत
आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
परंतु, उष्णतेचा हा त्रास केवळ मानवाला होत नसून जीवसृष्टीतील सर्व प्राण्यांना होतोय.
त्यामुळेच ठिकठिकाणच्या प्राणी संग्रहालयात विशेष काळजी घेतली जात आहे.
उष्णतेच्या झळांपासून थंडावा म्हणून एसी, कुलर, पंख्याची सोय जशी मानवासाठी आहे, त्याचप्रमाणे या उपकरणांचा वापर प्राण्यांसाठीही करण्यात येतो.
करुणाश्रमात प्राण्यांसाठी या आधुनिक सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत.
करुणाश्रमात अस्वल, बिबट्यासह इतर प्राण्यांचा समावेश आहे.
करुणाश्रमात असणाऱ्या बिबट, अस्वल या प्राण्यांना उन्हाच्या झळा बसत असल्याने कुलरची सुविधा करण्यात आली.
वर्ध्यात दिवसेंदिवस वाढत असणारे तापमान मानवासह प्राण्यांना त्रासदायक ठरत आहे.