IPL auction 2022 : 'या' वेगवान भारतीय गोलंदाजांना करारबद्ध करण्यासाठी संघ उत्सुक
या यादीत पहिलं नाव म्हणजे भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी. मागील सीजन पंजाबमध्ये असणाऱ्या शमीला यंदा पंजाब पुन्हा घेईल का? हे पाहावं लागेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशमी पाठोपाठ आणखी एक अनुभवी भारतीय गोलंदाज म्हणजे भुवनेश्वर कुमार. स्वींग किंग भुवनेश्वर कुमार मागी काही काळापासून फॉर्ममध्ये नसला तरी त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.
भारताच्या वेगवान गोलंदाजांची फौज म्हटलं की त्यातील एक दमदार नाव म्हणजे आवेश खान. दिल्लीकडून खेळणाऱ्या आवेशला संघ रिटेन करु शकला नाही. पण महालिलावात करारबद्ध नक्कीच करेल अशी आशा आहे.
यॉर्कर टाकण्यात तरबेज असणारा नटराजन कोरोनाची बाधा झाल्यामुळे मागील आयपीएल गाजवू शकला नाही. पण यंदा त्याला कोणता संघ करारबद्ध करतो आणि तो कशी कामगिरी करतो याकडे अनेकांची नजर आहे.
आयपीएल 2021 मध्ये पर्पल कॅप विजेता हर्षलवर यंदा तगडी बोली नक्कीच लागू शकते.
नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यात अफलातून कामगिरी करणारा प्रसिध पुन्हा केकेआरमध्ये जाणार की दुसरा कोणता संघ त्याला करारबद्ध करणार हे पाहावे लागेल.
केकेआरचा आणखी एक खेळाडू म्हणजे शिवम मावी. शिवमला मागील आयपीएलमध्ये एका षटकात पृथ्वीने 6 चौकार ठोकले खरे पण तरी यंदा तो पुन्हा जलवा दाखवतो का? हे पाहावे लागेल.
केकेआरचा तिसरा वेगवान गोलंदाज म्हणजे कमलेश नागरकोटी. त्याल कोणता संघ विकत घेतो हे पाहावे लागेल.