Suryakumar Yadav : सूर्याची बॅट तळपली, आयपीएलमधील स्वत:चाच विक्रम मोडला
या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) विजयाचा शिल्पकार ठरला. सूर्यकुमारच्या झंझावाती खेळीमुळे मुंबईनं बंगळुरुचा पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने स्वत:चाच विक्रम मोडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरसीबी विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वाधिक 83 धावांची खेळी केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात मुंबईला 200 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. सूर्यकुमारच्या शानदार खेळीमुळे मुंबईनं 16.3 षटकांत आव्हानं पूर्ण करत सामना जिंकला.
या सामन्यात सूर्यकुमारने केवळ 35 चेंडूत 83 धावांची धडाकेबाज खेळी केली. यासोबतच सूर्याने स्वत:चा जुना विक्रम मोडत नवीन विक्रम रचला आहे.
सूर्यकुमारने आयपीएलमध्ये 83 धावांची खेळी करत सर्वाधिक 82 धावांचा विक्रम मोडला आहे.
आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादवने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या गाठली आहे. मुंबई इंडियन्सचा (MI) फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या सामन्यात 35 चेंडूंत 83 धावा ठोकल्या.
सूर्यकुमारने आरसीबी विरुद्धच्या खेळीत सात चौकार आणि सहा षटकार ठोकले. सूर्याने त्याचा आयपीएलमधील आधीचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडला आहे. यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध होती.
आयपीएलचा सोळावा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी (MI) सर्वात मोठा चिंतेचा विषय होता सूर्यकुमार यादवचा फॉर्म.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या होम वनडे मालिकेत सूर्या सलग तीन सामन्यांत खातं न उघडताच तंबूत परतला होता. यानंतर या मोसमातील पहिल्या तीन सामन्यात सूर्याने फक्त 16 धावा केल्या.
यानंतर आता मात्र, सूर्यकुमार पुन्हा एकदा दमदार फॉर्ममध्ये परतलेला दिसत आहे. त्याने मागील सहा सामन्यांमधील चौथी अर्धशतकी खेळी केली आहे.