Golden Shower Tree: 'बहावा' बहरला; पानगळीनंतर पिवळ्या फुलांनी रान झाललं सोनेरी
निसर्ग मानवाला नेहमी विविध रुपी मानवाला अनमोल ठेवा देऊन जातो, तो कोणत्यानं कोणत्या स्वरूपात देऊन जातो, हे मानवाला न उलगडणार रहस्य.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचैत्राचे आगमन झालं की, निसर्गात अनेक रंगीबेरंगी फुलं फळं फुलायला सुरुवात होते.
पळस, जांभूळ, करंज, उक्शी, करवंद, कुडा यांच्यासोबत आणखी एक झाड संपूर्ण फुलांनी बहरतं म्हणजे, 'बहावा'.
पिवळ्याधम्मक फुलांच्या गुच्छहाराप्रमाणे भरलेल्या बहाव्याकडे पाहणं म्हणजे, नेत्रसुखच.
बहावा ही बहुगुणी वनस्पती पूर्वी फूट दोन फुटापासून तर 50 फुटापर्यंत असणार बहावा आता तसा कमी पाहवयास मिळतो. वृक्ष तोडीमुळे कमी होत असलेल्या जंगलामुळे बहावा तसा कमी आढळतो.
मात्र झाडांच्या या पानांपासून शेंग असो वा खोड (लाकूड) मुळापर्यंत मानवाला मोठी ठेव देतो.
पूर्वी शेती कामात बहावा लाकडी कामात मोठी मदत करत होता. तर आता मात्र औषधी वस्तूंचा वापर म्हणून आयुर्वेदामध्ये आढळतो, तसं पाहिलं तर मूळव्याध कोरडा खोकला, यासह दुर्धर आजारावर पानं फुलं आणि शेंगा बहुगुणी असतात.
वाढत शहरीकरण जंगलतोड यामुळे आता ही झाडं दुर्मिळ होत चालली आहेत.
ओसाड रानात मानवाला भुरळ घालणारी अशी मन प्रसन्न करणारी झाडं-झुडपं जगवणं ही काळाचा गरज झाली आहे.
नाहीतर येत्या काळात ही झाडं-झुडपं फक्त इंटरनेट किंवा पुस्तकाच्या पानांसह फोटो पुरती मर्यादित राहू नये म्हणजे झालं.
(सर्व फोटो : मनोज जायस्वाल, वाशिम)