SRH vs PBKS IPL 2023 : पंजाब विजयाची मालिका कायम राखणार की हैदराबाद खातं उघडणार? कसा असेल आजचा सामना? जाणून घ्या...
हैदराबादमध्ये 9 एप्रिल रोजी, रविवारी राजीव गांधी स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) सामना रंगणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचा हा तिसरा सामना असेल.
हैदराबाद संघाला अद्याप खातं उघडला आलेलं नाही. तर पंजाब किंग्स संघाने दोन्ही सामन्यांत विजयी कामगिरी कायम राखली आहे.
सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि या दोन्ही संघाचा आयपीएल 2023 मधील हा तिसरा सामना असेल.
पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात कोलकाताचा पराभव केला तर, दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला.
दुसरीकडे हैदराबाद संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. हैदराबाद सनरायजर्स संघाचा पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाकडून पराभव पत्करावा लागला.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) पंजाब किंग्स (PBKS) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आतापर्यंत 19 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये हैदराबाद संघाचं पारडं जड दिसून आलं आहे.
19 सामन्यांपैकी हैदराबाद संघाने 13 सामने तर पंजाब संघाने 6 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 होती. हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.
पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात 9 एप्रिल रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.
हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.