सांगली जिल्ह्यातील भाळवणीमध्ये आज भारतातील सर्वात मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचा थरार!
भारतातील सर्वात मोठी रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यत आज सांगलीत पार पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबैलगाडी शर्यतीची सुरवात गोमातेच्या पूजनाने झाली.
रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यत विजेत्याला महिंद्रा थार मिळणार आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील भाळवणमध्ये ही शर्यत होत आहे
डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार (दादा) पाटील युथ फौंडेशन वर्धापनदिनानिमित्त ही सर्वात मोठी 'रुस्तम-ए-हिंद' बैलगाडी शर्यत सन 2023/24 असे या स्पर्धेला नाव देण्यात आलं आहे.
या बैलगाडी शर्यतीसाठी आतापर्यंत शर्यतीसाठी कधीही न देण्यात आलेली भव्य अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ट्रॅक्टर आणि इतर विजेत्यांना दुचाकी गाड्या देण्यात येणार आहेत.
बैलगाडी शर्यतीमध्ये सुमारे 200 हून अधिक बैलगाडी शर्यत चालक सहभागी होतील, असा अंदाज डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या शर्यतीच्या निमित्ताने रक्तदानाचा सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी एका बैलगाडीच्या नोंदणीबरोबर सहा जणांनी रक्त रक्तदान करावं, असा निर्णय घेण्यात आला आहे