Weather : अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी उन्हाचा कडका तर कधी अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, मराठवाड्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज पश्चिम महाराष्ट्रासहमराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
अवकाळी पावसामुळं कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
अवकाळी पावसामुळं सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळं द्राक्षांच्या दारत देखील घसरण झाली आहे.
कोकणातही अवकाली पावसानं हजेरी लावली आहे. तळकोकणात सलग दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, कोकम, जाभूळ पिकांना फटका बसला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जावरांचा मृत्यू देखील झाला आहे. तर, गहू, ज्वारी यासह आंब्याचा मोहर पूर्णपणे गळून गेला असून, नव्यानं लागवड केलेल्या भाजीपाल्याचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे