MI vs SRH IPL 2023 : मुंबई आणि हैदराबाद यांच्यात रणसंग्राम, कोण मारणार बाजी?
MI vs SRH Match Preview : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील रोमांचक सामना मंगळवारी, 18 एप्रिल रोजी मुंबई आणि हैदराबाद (SRH vs MI) यांच्यात पाहायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर यंदाच्या आयपीएलमधील 25 वा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाची मुंबई इंडियन्स (MI) संघाविरुद्ध लढत पाहायला मिळेल.
दोन्ही संघ त्यांचे मागील दोन सामने जिंकून या सामन्यात विजयाच्या हॅटट्रिकसाठी उतरणरा आहे. कोणता संघ विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करेल हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सलग पराभवांसह त्यांच्या मोहिमेची सुरुवात केली. पण, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध विजय मिळून संघाने पुनरागमन केलं.
image 6
दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पहिले दोन सामने गमावले पण त्यानंतरच्या सामन्यात पुनरागमन करत पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला.
दोन्ही संघांनी पुन्हा एकदा विजयी पथावर असल्यामुळे आजचा सामना फारच रोमांचक होणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेमध्ये मुंबई इंडियन्स संघ आठव्या स्थानावर आहे तर सनरायझर्स हैदराबाद नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे आगामी सामना जिंकून दोन्ही संघांना गुणतालिकेत झेप घेता येईल.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 19 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड जड दिसून आलं आहे.
मुंबईने 19 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.