Sandeep Sharma IPL : 'सुपरमॅन' संदीप शर्मा! सूर्यकुमारसाठी ठरला कर्दनकाळ; 19 मीटर अंतर उलट दिशेने धावत घेतला झेल
प्रत्युत्तरात मुंबई संघाने 19.3 षटकात 214 धावांचा डोंगर रचला आणि सामना सहा विकेटने जिंकला. या सामन्यात राजस्थानला पराभव पत्करावा लागला असला तरी संघासाठी दमदार खेळी करणाऱ्या खेळाडूंचं प्रचंड कौतुक होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यात एका खेळाडून साऱ्यांचं लक्ष वेधलं. त्यानं दमदार फलंदाज सुर्यकुमार यादवला झेलबाद केलं. इतकंच नाही तर या सामन्यात दुसऱ्या षटकात त्यानं मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मालाही बोल्ड केलं.
मुंबई संघाकडून सुर्यकुमार यादव दमदार फलंदाजी करताना दिसत होता. त्याने अर्धशतकी खेळी केली. मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात सुर्या झेलबाद झाला.
राजस्थान रॉयल्सच्या संदीप शर्मानं सुर्यकुमार यादवला शानदार डायव्हिंग झेल घेत, त्याला तंबूत माघारी धाडलं. त्यानं झेल घेण्यासाठी 19 मीटर अंतर उलट दिशेने धावत जात डॅशिंग झेल घेतला.
सुर्यकुमार यादवचा झेल घेणाऱ्या संदीप शर्माचं सर्वत्र कौतुक होतं आहे. या दमदार कॅचचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोळाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने चेंडू टाकला. सूर्यकुमार यादवने मारलेला चेंडू शॉर्ट फाईन लेगकडे गेला. 30 यार्डच्या वर्तुळात उभा असलेला संदीप शर्मा मागच्या बाजूला धावत गेला आणि डायव्हिंग करत उत्तम झेल घेतला.
यासोबतच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने याला त्याच्या वाढदिवसा दिवशी (30 एप्रिल) बोल्ड करत केवळ 3 धावांवर तंबूत पाठवलं.