Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion : पावसामुळे कांदा सडला, भाव नसल्याने निराशा; सटाण्यात शेतकऱ्याकडून कांद्यावर अंंत्यसंस्कार
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजून सडू लागला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजारात त्या कांद्याला कोणी बोली लावेना..बोली लागली तर तीही कवडीमोल भावाची.
परिणामी शेतकऱ्यांचा बाजारात नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाही.
यामुळे हताश झालेल्या नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील योगेश सोनवणे या शेतकऱ्याने शेतातील कांद्यावर अंत्यसंस्कार केला.
शेतात साठवून ठेवलेल्या कांद्यावर अंत्यसंस्कार करत कांदा ट्रॅक्टरने पसरवून नष्ट करत विधीवत अंत्यविधी करुन भावानांना मोकळी वाट करुन दिली.
शेतात राब राब राबून कांदा पिकवायचा अन् निसर्गाने तो हिरावून न्यायचा, यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
मायबाप सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, सक्तीची वीजबिल आणि कर्जवसुली तूर्त थांबवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी सोनवणे यांनी व्यक्त केली.