Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Din 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंकडून हुतात्म्यांना नमन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 63 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज 63 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
तत्पूर्वी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत यांनी रात्री 12 वाजता मुंबईतील हुतात्मा चौकात हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात पुष्पहार अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या अनेक नेत्यांनी हुतात्मा चौकात आदरांजली वाहिली.
पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीहीदेखील हुतात्मा चौकात हजेरी लावली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हुतात्मा चौकात जाऊन आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. मी येत्या वर्षात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रार्थना करतो.