Rohit Sharma Birthday : रोहितचा असाही विक्रम, 'हिटमॅन'च्या आसपासही नाही दुसरा खेळाडू
रोहित शर्मा सध्या टीम इंडियाच्या तिन्ही संघाचा कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात यंदा मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुणतालिकेत मुंबईचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. मुंबईला सात सामन्यात चार पराभवाचा सामना करावा लागलाय. पण रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने आयपीएलचा चषक चारवेळा उंचावलाय.
त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा द्विशतक झळकावलेय.
रोहित शर्मा याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 मध्येच संधी मिळाली. पण सुरुवातीच्या काळात रोहित शर्मा याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. मध्यक्रमला फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला संघात स्थान टिकवता आले नव्हते.
रोहित शर्मा 2013 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पहिल्यांदा सलामीला उतरला होता. त्यानंतर रोहित शर्माने मागे वळून पाहिलेच नाही.
रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू आहे.
सलामीला संधी मिळाल्यानंतर रोहित शर्मा याच्या कामगिरीत सातत्य आले. रोहित शर्मा याने धावांचा पाऊस पाडला. सलामीला फलंदाजी करताना रोहित शर्मा याने वनडे मध्ये तीन द्विशतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
रोहित शर्माने अनेक मुलाखतीत त्यासाठी धोनीच्या नावाचा उल्लेख केला आहे. धोनीने सलामीला पाठवल्यामुळेच खेळात सातत्य आल्याचे सांगण्यात येते.