IPL 2023 : मिचेल मार्श - साल्ट यांची एकाकी झुंज, दिल्लीचा 9 धावांनी पराभव
DC vs SRH, IPL 2023 : अटीतटीच्या लढतीत हैदराबादने दिल्लीचा 9 धावांनी पराभव केला. दिल्लीने दिलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 188 धावांपर्यंत मजल मारला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीचा पराभव करत हैदराबादने वचपा काढला. लीग फेरीतील पहिल्या सामन्यात दिल्लीने हैदराबादचा पराभव केला होता.
दिल्लीकडून फिल साल्ट आणि मिचेल मार्श यांनी अर्धशतकी खेळी केली. तर हैदराबादकडून मयांक मार्केंडय याने भेदक मारा केला.
हैदराबादने दिलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्मात असलेला कर्णधार डेविड वॉर्नर खातेही न उघडता तंबूत परतला.
भुवनेश्वर कुमार याने वॉर्नरला बाद करत हैदराबादला दमदार सुरुवात करुन दिली. डेविड वॉर्नर बाद झाल्यानंतर मिचेल मार्श आणि साल्ट यांनी दिल्लीचा डाव सावरला.
मिचेल मार्श आणि फिल साल्ट वादळी फलंदाजी केली. दोघांनी 112 धावांची भागिादरी करत दिल्लीच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मिचेल मार्श याने29 चेंडूत 63 धावांची खेळी केली. या खेळीत मार्श याने सहा षटकार आणि एक चौकार लगावला. तर फिल साल्ट याने 35 चेंडूत 59 धावांचे योगदान दिले. या खेळीत साल्ट याने 9 खणखणीत चौकार लगावले. साल्ट याला मार्केंडे याने तंबूत पाठवले तर मिचेल मार्श याला अकील हुसेन याने बाद केले.
मार्श-साल्ट जोडी बाद झाल्यानंतर दिल्लीचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अखेरीस अक्षर पटेल याने आक्रमक फंलदाजी केली पण इतरांची साथ मिळाली नाही. साल्ट-मार्श बाद झाल्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केली. मनिष पांडे एक धाव, प्रियम गर्ग 12, सर्फराज खान 9 यांना मोठी खेळी करता आली नाही.
अक्षर पटेल याने अखेरीस 14 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार लगावले. तर रिपल पटेल याने 11 धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून मयंक मार्कंर्डेय याने चार षटकात अवघ्या 20 धावा खर्च करत दोन फलंदाजांना तंबूत धाडले. त्याशिवाय भुवनेश्वर कुमार, अभिषेक शर्मा, टी नटराजन, अकिल हुसेन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
अभिषेक शर्मा याचे वादळ आणि कालसन याच्या झंझावाताच्या बळावर हैदाराबादने निर्धारित 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 197 धावांपर्यंत मजल मारली. अभिषेक शर्मा आणि हेनरिक कालसन यांनी वादळी खेळी केली. दिल्लीकडून मिचेल मार्श याने चार विकेट घेतल्या.