APMC Election : बाजार समित्यांमध्ये कोणाला मिळणार कौल? आज चित्र स्पष्ट होणार
राज्यात विविध ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदानाला सुरुवात. मतदारांचा चांगला प्रतिसाद
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान होत आहे. 787 मतदार आहेत. 18 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.
बाजार समित्यांच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळतोय.
राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय मिळवला आहे.
या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला आहे. तर बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी गटालाही धक्का बसल्याचे चित्र आहे.
बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे, नाशिक जिल्ह्यात मंत्री दादा भूसे, मंत्री विजयकुमार गावीत, एकनाथ खडसे या सारख्या नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या ' आपलं पॅनल ' ला धक्का देत शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्या कर्मवीर भाऊसाहेब पॅनल विजयी.
संजय राऊतांच्या आरोपांनंतरही दौड बाजारसमितीत आमदार राहुल कुल यांचा दणदणीत विजय झाला आहे.
भुसावळ जळगाव : बाजार समितीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भुसावळमध्ये धक्का बसला आहे. भुसावळमध्ये 18 पैकी 15 जागांवर भाजप सेनेचा विजय झाला आहे.