IPL 2023 : बंगळुरु हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार, संघासाठी अनलकी! ही जर्सी घालण्याचं कारण माहितंय?
IPL 2023 RCB Green Jersey : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबंगळुरुच्या घरच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात आरसीबी हिरव्या रंगाची जर्सी घालून उतरणार आहे. आजचा सामना बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर होणार आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या आजच्या सामन्यातन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ हिरव्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे.
सोशल मीडियावर आरसीबीच्या ग्रीन जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या ग्रीन जर्सीमध्ये विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक दिसत आहेत.
आरसीबीची ग्रीन जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडल्याचं दिसून येत आहे.
आरसीबी 23 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर ग्रीन जर्सी परिधान करुन मैदानात उतरणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ एका सामन्यात ही हिरवी जर्सी परिधान करतात. यंदाही आरसीबी ही परंपरा कायम राखणार आहे.
दरम्यान, ग्रीन जर्सीमध्ये त्यांना पराभवाचाच सामना जास्त करावा लागत आहे. ग्रीन जर्सी आरसीबीसीठी अनलकी असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं.
आरसीबीने हिरवी जर्सी घालून खेळलेल्या 10 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे. फक्त दोन सामन्यांमध्ये संघाला विजय मिळाला असून एका सामना ड्रॉ झाला.