Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Mandir Construction : अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम किती पूर्ण झालं?
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) किती बांधकाम पूर्ण झाले आहे? याचं उत्तर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या फोटोवरुन मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने हा फोटो जारी केला आहे. त्यात मंदिराचा पूर्ण आकार दिसत आहे.
उंचावरुन काढलेल्या या फोटोमध्ये मंदिराच्या बाहेरील भिंती बांधण्यात आल्याचं दिसत आहे. तसंच तळमजल्याचा संपूर्ण आकारही स्पष्टपणे दिसून येत आहे.
राम मंदिर ट्रस्ट वेळोवेळी फोटो शेअर करुन मंदिराच्या बांधकामाशी संबंधित माहिती लोकांना देत असतं. असंख्य लोकांची श्रद्धा असलेल्या रामललाच्या भव्य मंदिराचं बांधकाम लोकांना पाहता यावं हा यामागील उद्देश आहे
ट्विटरवर जारी केलेल्या या व्हिडीओमध्ये तळमजल्यावरील खांब आणि भिंती यामध्ये दिसत आहेत.
सध्या तळमजल्यावरील छप्पर बांधलं जात आहे. मंदिराच्या ठिकाणी बांधकाम करणारे कामगार दिसत आहेत. तळमजल्यावरील खांबांवर बीम टाकण्याचे काम सुरु आहे.
याआधी 6 एप्रिल रोजी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने फोटो जारी केले होते. या फोटोंमध्ये प्रवेशद्वाराचा पूर्ण आकार दाखवण्यात आला होता. तसंच तळमजल्यावरील खांब दाखवण्यात आले.
डिसेंबर 2023 पर्यंत भगवान रामाचं गर्भगृह तयार होईल आणि जानेवारी 2024 नंतर म्हणजेच मकरसंक्रांतीनंतर गर्भगृह भक्तांसाठी खुलं केलं जाईल, असं सांगण्यात येत आहे.
मात्र, मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरु राहणार आहे. राम दरबार व्यतिरिक्त माता अन्नपूर्णा, भगवान शंकर, बजरंगबलीसह अनेक मंदिरं इथे बांधली जाणार आहेत.