Pune News : आंबे खा आंबे! पुण्यात लहानग्यांची आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा
उन्हाळा म्हटलं की आंबा खाण्याचा आनंद प्रत्येकालाचा असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेच पाहून पुण्यात लहान मुलांची थेट आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली.
प्रल्हाद गवळी मित्रपरिवारतर्फे आयोजन करण्यात आलं होतं.
पिवळ्या धम्मक रसाळ आंब्यांनी भरलेले हात आणि तोंड...हसत एकमेकांना चिडवत आंबे खाण्यासाठी सुरु असलेली चढाओढ..अशा आंबेमय झालेल्या वातावरणात, विशेष म्हणजे बालगोपाळांसह कष्टकऱ्यांच्या मुलांनी आंब्यावर मनसोक्त ताव मारला.
हरियाणातील सुप्रसिद्ध महाबली हनुमान व दोन वानर वेशभूषेमध्ये कलाकारांनी यावेळी मुलांचा उत्साह वाढवला.
यामध्ये शहराच्या पूर्व भागातील कष्टकरांच्या मुला मुलींसह, विविध सामाजिक संस्थांमधील चिमुकले सहभागी झाले होते.
प्रल्हाद गवळी मित्र परिवारातर्फे रविवार पेठेतील संत नामदेव चौक येथे ही स्पर्धा झाली.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत मुळशी पॅटर्न फेम अभिनेता रमेश परदेशी उर्फ पिटया भाई याने स्वतः सहभागी होत एका मिनीटात चार आंबे खाल्ले आणि या मुलांचा उत्साह वाढवला.