IPL 2023 : आरसीबीचा राजस्थानवर रॉयल विजय, मॅक्सवेल-फाफ-हर्षल विजयाचे शिल्पकार
RCB vs RR, IPL 2023 : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानवर रॉयल विजय मिळवला. दोन रॉयलमध्ये झालेल्या लढतीत आरसीबीने बाजी मारली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरसीबीने राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने निर्धारित २० षटकात १८९ धावांपर्यंत मजल मारली.
मॅक्सवेल, फाफ डु प्लेसिस आणि हर्षल पटेल आरसीबीच्या विजयाचे सुत्रधार राहिले. मॅक्सवेल आणि फाफ यांनी वादळी अर्धशतके झळकावली. त्यानंतर गोलंदाजीत हर्षल पटेलने तीन विकेट घेतल्या.
आरसीबीने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवा खराब झाली. पहिल्याच षटकात सिराजने जोस बटलरला तंबूत धाडले. जोस बटलरचा खातेही उघडता आले नाही. पण त्यानंतर युवा यशस्वी जायस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी सामन्यचे चित्र बदलले. दोघांनी दमदार फलंदाजी केली. दुसऱ्या विकेटसाठी या युवा फलंदाजांमध्ये ९८ धावांची भागिदारी झाली. देवदत्त पडिक्कल याने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली
पडिक्कलने ३४ चेंडूत एक षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने ५२ धावांचे योगदान दिले. पडिक्कल बाद झाल्यानंतर यशस्वी जायस्वालही बाद झाला. जायस्वाल याने ३७ चेंडूत दोन षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली
जायस्वाल बाद झाल्यानंतर सामव्याचे चित्र बदलले. आरसीबीने सामन्यावर पकड मिळवण्यास सुरुवात केली. संजू सॅमसन २२धावा काढून बाद झाला... शिमरोन हेटमायर तीन धावांवर धावबाद झाला. सुयेशप्रभुदेसाई याने जबरदस्त थ्रो करत हेटमायरला धाबाद केले.
ध्रुव जुरेल याने अखेरपर्यंत लढा दिला. जुरेल याने १६ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. अश्विन याने १२ धावांचे योगदान दिले.
आरसीबीकडून हर्षल पटेल याने भेदक मारा केला. पटेलने चार षटकात ३२ धावांच्या मोबद्लयात तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय मोहम्मद सिराज आणि डेविड विली यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने २० षटकात नऊ विकेटच्या मोबदल्यात १८९ धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल याने ७७ तर फाफ डु प्लेलिस याने ६२ धावांची खेळी केली. आरसीबीला अखेरच्या पाच षटकात धावा जमवण्यात अपयश आले. आरसीबीने अखेरच्या पाच षटकात फक्त ३३ धावा जमवल्या. यादरम्यान आरसीबीने पाच विकेट गमावल्या. हाणामारीच्या षटकात चहल याने भेदक मारा केला. आरसीबीचे तीन फलंदाज धावबाद झाले.