यंदाच्या हंगामात या सहा दिग्गजांनी केले निराश, पाहा संपूर्ण यादी

IPL 2023 : आतापर्यंत आयपीएलमध्ये अनेक स्टार खेळाडूंनी प्रभावित केलेय. पण काही खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करता आली नाही. यामध्ये दिल्लीच्या पृथ्वी शॉपासून राजस्थानच्या रियान पराग याचा समावेश आहे.

IPL 2023

1/6
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा दिग्गज अष्टपैलू मिचेल मार्श याला अद्याप सूर गवसलेला नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीत मिचेल मार्श अद्याप फ्लॉप राहिलाय. यंदाच्या आयपीएलमध्ये मिचेल मार्श याला चार डावात 16, 0, 4, 0 आणि 2 धावा केल्या आहेत. गोलंदाजीतही प्रभावी राहिला नाही.
2/6
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार सलामी फलंदाज पृथ्वी शॉ याची बॅट यंदा शांत असल्याचे दिसत आहे. पृथ्वी शॉ याला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. सहा डावात पृथ्वी शॉ याला एकदाही ३० चा पल्ला पार करता आला नाही. दोन वेळा पृथ्वी शॉ गोल्डन डकचा शिकार झालाय. 12, 7, 0, 15, 0 आणि 13 धावा पृथ्वी शॉ याने धावा केल्या आहेत.
3/6
राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. राजस्थान रॉयल्स गुणतातालिकेत आघाडीवर आहे. पण राजस्थानचा मध्यक्रमचा फलंदाज रियान पराग फ्लॉप ठरलाय. आतापर्यंत रियान परागला मोठी खेळी करता आली नाही. रियान परागला चार डावात फक्त एकवेळा दुहेरी धावसंख्या पार करता आली. रियान परागचा यंदाची सर्वोच्च धावसंख्या 20 इतकी आहे. इतर तीन डावात रियान पराग याने 7, 20, 7, 5, आणि 15* धावा खेळली आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत रियान पराग याच्यावर विश्वास दाखवलाय. पण रियान अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करु शकला नाही.
4/6
कोलकात्याचा अष्टपैलू मनदीप सिंह फ्लॉप राहिलाय. तीन सामन्यात मनदीप याने १४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १२ इतकी आहे.
5/6
देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभारणारा सरफराज यंदा दिल्लीच्या संघाचा भाग आहे. पण सरफराजला अद्याप धावा काढता आल्या नाहीत. दोन डावात सरफराजने फक्त ३४ धावा केल्या आहेत. विकेटकीपींगमध्येही सरफराजला काही खास करता आले नाही.
6/6
आरसीबीचा दिनेश कार्तिक याला आपल्या लौकिकास कामगिरी करता आली नाही. दिनेश कार्तिक याला सहा डावात ४५ धावा केल्या आहेत. कार्तिका यंदा फक्त एक षटकार लगावता आला नाही. त्याशिवाय फक्त पाच चौकार मारले आहेत.
Sponsored Links by Taboola