Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RCB vs DC, IPL 2023 : दिल्ली मैदान मारणार की आरसीबी वरचढ? DC पहिल्या विजयासाठी रणांगणात
दिल्ली कॅपिटल्स यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दिल्ली संघाने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत खेळलेले सर्व चार सामने गमावले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) शनिवारी दुपारी 3.30 वाजता (RCB vs DC) हा सामना रंगणार आहे. बंगळुरूच्या घरच्या मैदानावर आज दिल्लीची कसोटी पाहायला मिळणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज बंगळुरु येथे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आरसीबीचा हा चौथा सामना असेल, तर दिल्लीचा हा पाचवा सामना असेल.
यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी आरसीबी संघाने एक सामना जिंकला तर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे दिल्ली संघाला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत.
यामध्ये बंगळुरुचं पारड जड दिसून आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 27 पैकी 16 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्स संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. एक सामना ड्रॉ झाला.
दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 190 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आरसीबी (RCB) आणि दिल्ली (DC) यांच्यात 15 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक दुपारी 3.00 वाजता होईल.
दिल्लीचा संघ यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवण्यासाठी आरसीबी विरोधात मैदानात उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. दिल्ली संघाने आयपीएल 2023 मध्ये अजून खातंही उघडलेलं नाही.
दिल्ली संघाचा हा पाचवा सामना असेल. तर दुसरीकडे आरसीबी संघाचा हा चौथा सामना असेल. यंदाच्या मोसमात याआधी खेळलेल्या तीन सामन्यांपैकी बंगळुरुने एक सामना जिंकला असून दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.