IPL मधून बाहेर गेलेल्या RCB ची सोशल मीडियावर क्रेझ कायम, CSK ला पछाडलं
आरसीबी संघाचं आयपीएल विजेते होण्याचं स्वप्न यंदाही धुळीस मिळालं आहे. असं असलं तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मागे टाकलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएल 2023 (IPL 2023) च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आणि पुन्हा एकदा आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी निराश आली.
माजी कर्णधार विराट कोहलीचा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाच्या शर्यती आधीच बाहेर पडला नाही. आरसीबीला एकदाही आयपीएल जिंकला आलेली नाही.
आरसीबी संघ आयपीएलच्या 16 व्या हंगामातून बाहेर पडला आहे. पण या संघाने चेन्नई सुपर किंग्जला देखील एका बाबतीत पराभूत केलं आहे.
आरसीबी संघानं प्रसिद्धीच्या बाबतीत चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससह सर्व आयपीएल फ्रेंचायझींना मागे टाकलं आहे.
आशियामध्ये आरसीबीचा संघ सोशल मीडियावर पहिल्या क्रमांकावर आहे, इतकंच नाही तर सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या बाबतीत आरसीबी संघ जगात फुटबॉल क्लब रिअल माद्रिदच्या मागे आहे.
एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर एंगेजमेंट डेटा समोर आला आहे. यामध्ये जगातील तीन क्रीडा संघांची चलती पाहायला मिळाली आहे.
स्पॅनिश फुटबॉल क्लब रियल माद्रिद या यादीत अव्वल आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघ आहे.
तिसऱ्या स्थानावर कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आहे. Deportes आणि Finanzas नावाच्या कंपन्यांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, संपूर्ण आशिया खंडात सोशल मीडियाचा 'किंग' रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघ आहे. याबाबतीत आरसीबी संघ पहिल्या क्रमांकाचा क्रीडा संघ आहे. यावरून विराट कोहली आणि आरसीबी संघाचा चाहतावर्ग किती मोठा आहे हे दिसून येतं.