Nagpur : अस्वलाला फळांची तर वाघाला मटणाची आईस कँडी, नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात 'आईसक्रिम पार्टी'
नागपूरच्या गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आईस कँडी चा प्रयोग केला जत आहे

Feature Photo
1/10
सध्या उन्हाच्या झळा लागल्यानं प्रत्येक जण त्रस्त आहे.
2/10
उन्हाळ्यात आईस्क्रिम खाण्याचा आग्रह प्रत्येकाला असतो.
3/10
नागपूरच्या गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात सध्या खास "आईस कँडी" चा प्रयोग केला जातोय.
4/10
अस्वलाला फळांची आईस कँडी, तर वाघाला मटणाची आईस कँडी दिली जात आहे.
5/10
उन्हाची तिरीप वाढल्यानं प्राणीही त्यावर यथेच्छ तावही मारत आहेत.
6/10
दुपारनंतर प्राणी संग्रहालयात वन्य प्राण्यांच्या नेहमीच्या फिरण्याच्या जागेवर त्यांचे रखवालदार आधी आईस कँडी झाडावर लटकवून ठेवतात
7/10
त्यानंतर या प्राण्यांना विशिष्ट आवाजाने बोलावतात.
8/10
त्यांचा हा आवाज ऐकला की हे प्राणी बरोबर त्या झाडाजवळ गोळा होतात आणि या आईसक्रीमवर ताव मारतात.
9/10
उष्णतेच्या झळांपासून थंडावा म्हणून एसी, कुलर, पंख्याची सोय जशी मानवासाठी आहे, त्याचप्रमाणे या उपकरणांचा वापर प्राण्यांसाठीही करण्यात येतो.
10/10
ठिकठिकाणच्या प्राणी संग्रहालयात विशेष काळजी घेतली जात आहे.
Published at : 26 May 2023 09:53 AM (IST)