Skin Care Tips: चेहऱ्यावर हवी झटपट चमक? तर, बेसनपासून घरीच बनवा 'हा' फेस पॅक
अचानक कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन असेल, तेव्हा चमकदार त्वचेसाठी पहिली पसंती चेहऱ्यावर बेसन लावण्याला असते. चेहऱ्याच्या तेजासाठी बेसनाचा वापर शतकानुशतके होत आहे. आजही अनेक महिला चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी बेसनावर अवलंबून आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवास्तविक, बेसनामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, जे त्वचेला आतून सुधारण्याचे काम करतात. जर तुम्ही आजपर्यंत चेहऱ्यावर बेसनाचा वापर केला नसेल, तर आजच ही ट्रिक लक्षात ठेवा. तुम्हाला अचानक घराबाहेर पडावं लागलं तर हा घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरेल.
चेहऱ्यावर बेसन कसे वापरायचे ते जाणून घेऊया. तर, बेसनाचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम बेसन आणि मध लागेल.
नंतर एक वाटी घ्या, त्यात दोन चमचे बेसन घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. नंतर दोन्ही चांगले मिक्स करा. लक्षात ठेवा की मिश्रण थोडेसे ओले असावे, जेणेकरून ते संपूर्ण चेहऱ्यावर सहज लावता येईल. बेसन पिठात थोडी हळद मिसळल्यास त्वचा आणखी निखारेल.
बेसन आणि मध यांचे मिश्रण तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. नंतर कोरडे झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. चेहरा धुतल्यानंतर त्यावर मॉइश्चरायझर लावा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हा फेस पॅक रोज वापरू शकता, कारण तो पूर्णपणे नैसर्गिक आहे.