CSK vs RR : अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नईचा पराभव, मोईन अलीची 93 धावांची खेळी व्यर्थ
अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोईने अलीच्या 93 धावांच्या वादळी खेळीच्या बळावर निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात चेन्नईने केवळ 150 धावा केल्या.
सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत चेन्नईने फलंदाजी घेतली. पण सलामीवीर ऋतुराज स्वस्तात बाद झाला. कॉन्वेही 16 धावा करण्यातच यशस्वी झाला.
मोईने अलीने सुरुवातीपासून दमदार फलंदाजी सुरु ठेवली. पण त्याला खास कोणाचीच साथ मिळाली नाही. केवळ धोनीने 26 धावांची खेळी केली, इतर फलंदाज दुहेरी आकडेवारीही गाठू शकले नाहीत.
राजस्थानकडून सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण ओबेद मेकॉयने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 4 षटकात 20 धावा देत 2 विकेट्स नावे केल्या आहेत. तर चहलनेही दोन तर आश्विन आण बोल्टने प्रत्येकी एक विकेट घेतली.
राजस्थान संघाने अखेरच्या साखळी सामन्यात अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थानने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. अश्विनने गोलंदाजी करताना महत्तवाची एक विकेट घेतली. तर फलंदाजीमध्ये नाबाद 40 धावांची खेळी केली. चेन्नईने दिलेले 151 धावांचे आव्हान चेन्नईने पाच गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पार केले.
151 धावांचा आव्हान पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला जोस बटलर अवघ्या दोन धावा काढून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही 15 धावा काढून बाद झाला. देवदत्त पडिकल तीन धावा काढून बाद झाला..
यशस्वी जयस्वाल आणि आर अश्विन यांनी डाव सावरला. जोडी जमली असे वाटत असतानाच 59 धावांवर यशस्वी बाद झाला. यशस्वीने संयमी फलंदाजी करत संघाचा डाव सावरला.
अश्विनने रियान परागसोबत राजस्थानला विजय मिळवून दिला. अश्विन आणि रियान पराग यांनी 20 चेंडूत 39 धावांची भागिदारी केली. अश्विनने नाबाद 40 धावांची खेळी केली. रियान पराग 10 धावांवर नाबाद राहिला.
चेन्नईकडून प्रशांत सोळंकीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.