Photo: रसलपासून तर पोलार्डपर्यंत; खूपच सुंदर दिसतात वेस्ट इंडीजच्या 'या' क्रिकेटपटूंच्या पत्नी, पाहा फोटो
पूर्ण सात वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर कायरन पोलार्ड आणि जेना अली यांनी अखेर 2012 मध्ये लग्न केलं. या जोडप्याला आता दोन अतिशय सुंदर मुले देखील आहेत. जेन्ना त्रिनिदादमध्ये स्पोर्ट्स अॅक्सेसरीजचा व्यवसाय चालवते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज आंद्रे रसेलची पत्नी जसिम लोरा ही एक व्यावसायिक मॉडेल आहे. दोघांनी 2016 मध्ये एकमेकांशी लग्न केलंय. आंद्रे रसलला चियर करण्यासाठी अनेकदा जसिमला क्रिकेट मैदानात पाहिलं गेलं आहे. आंद्रे रसल आणि जसिम लोरा एक मुलगी आहे.
वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमारच्या पत्नीचं नाव उमराव निर्वाणी आहे. नुकतंच उमराव निर्वाणीनं एका मुलाला जन्म दिला आहे. शिमरॉन आपल्या मुलाच्या जन्माच्या काही तासांपूर्वी राजस्थान रॉयल्सचा बायो-बबल सोडून घरी परतला होता. आता तो पुन्हा संघात सामील झाला आहे.
वेस्ट इंडीजचा विकेटकीपर आणि फलंदाज निकोलस पूरननं त्याची प्रेयसी कॅथरीना मिगेलसोबत लग्न केलं. 2018 साली दोघ लग्नाच्या बेडीत अडकला. लग्नाआधीही दोघेही बऱ्याच एकत्र दिसले होते.
वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नारायण 2013 मध्ये नंदिता कुमारसोबत लग्न केलं. नंदिता ही नेल आर्टिस्ट आहे. नारायणसोबत ती अनेकदा भारतात येत होती. केकेआरच्या सामन्यांमध्ये ती अनेकदा संघाला चीयर्स करताना दिसली आहे.