Mohammed Shami : मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट, ग्राऊंडवर फेरफटका मारला, संघात कमबॅक कधी होणार?
मोहम्मद शमीनं बॉलिंग 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये केली होती. त्यानंतर झालेल्या दुखापतीमुळं तो संघाबाहेर आहे. आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपला तो मुकला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुखापत ग्रस्त झाल्यानंतर मोहम्मद शमी क्रिकेटपासून दूर आहे. शमी घोट्याला दुखापत झालेली असताना देखील त्यानं वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर शमीच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तो दुखापतीतून सावरत आहे.
मोहम्मद शमीनं सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तो सपोर्ट स्टिकच्या आधारानं उभा असल्याचं पाहायला मिळालं.
मोहम्मद शमी सपोर्ट स्टिकच्या मदतीनं ग्राऊंडवरील नेटमध्ये जिथं प्रॅक्टिस केलं जातं तिथं फेरफटका मारताना पाहायला मिळतो. चाहते यानंतर शमी लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.
मोहम्मद शमी आयपीएलला मुकला असून आता टी-20 वर्ल्ड कपला देखील त्याला मुकावं लागणार आहे. तो सप्टेंबर 2024 मध्ये क्रिकेट खेळताना दिसून येईल.
बीसीसीआय सचिव जय शाहांनी सप्टेंबर 2024 मध्ये बांगलादेश विरुद्ध भारताच्या मालिकेसंदर्भात माहिती दिली होती. त्यास्पर्धेत मोहम्मद शमी पुनरागमन करु शकतो.