इम्रान खान ९ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार , आगामी चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवात..

बॉलिवूड अभिनेता इम्रान खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. आता हा अभिनेता लवकरच चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे.

(photo:imrankhan/ig)

1/10
आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने त्याच्या पहिल्या 'जाने तू या जाने' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
2/10
पहिल्याच चित्रपटापासून इम्रान रातोरात इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाला. मात्र त्यानंतर इम्रान खान इतका अप्रतिम अभिनय दाखवू शकला नाही आणि तो चित्रपटांपासून दूर राहिला.
3/10
आता 9 वर्षांनंतर अभिनेता अभिनयाच्या दुनियेत परतणार आहे.
4/10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान खानने आगामी चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. त्याने गोव्यात शूटिंग सुरू केले आहे.
5/10
इम्रानसोबत या चित्रपटात मुख्य अभिनेत्री कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर मोना सिंग या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे.
6/10
मोना याआधी आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा, 3 इडियट्स सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.
7/10
इम्रान खानच्या कमबॅक चित्रपटाचे नाव हॅप्पी पटेल असणार आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यात आमिर खानची कॅमिओ भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
8/10
हॅपी पटेल हा विनोदी चित्रपट असणार आहे. हा चित्रपट आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसने बनवला आहे.
9/10
हॅप्पी पटेलनंतर इम्रान खान लवकरच वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. इम्रानने पुनरागमन करण्याचा निर्णय घेतल्यापासून त्याच्याकडे बरीच कामे येऊ लागली आहेत.
10/10
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर इम्रान खान लेखा वॉशिंग्टनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात. नुकतेच दोघेही करण जोहरच्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले आहेत.(photo:imrankhan/ig)
Sponsored Links by Taboola