IPL 2023 : जंगी सामन्याआधी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची भेट, दोघांचे फोटो चर्चेत
MI vs RCB, IPL 203 Match 54 : मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर आज दोन दिग्गज क्रिकेटपटू आमने-सामने येणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या टीम इंडियाच्या आजी-माजी कर्णधारांमध्ये आज लढत पाहायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही खेळाडू सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जातात. दोघांचंही भारतासह परदेशाताही मोठा चाहतावर्ग आहेत.
आजच्या जंगी सामन्या आधी विराट कोहलीची मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट झाली आहे. मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची भेट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
आज वानखेडे स्टेडिअमवर रंगणाऱ्या सामन्या आधी कोहली आणि तेंडुलकरची भेट झाली आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये दोघे हात मिळवताना, हसताना आणि बोलताला दिसत आहेत. मुंबई आणि बंगळुरु दोन्ही संघ सामन्या आधी सराव करताना दिसत आहेत.
यावेळी या दोघांची भेट झाली. दोन दिग्गज क्रिकेटपटूंना एकत्र पाहून चाहते खूश झाले आहेत.
वानखेडे स्टेडिअमवर दोन्ही संघांचा कसून सराव सुरु आहे. दोन्ही संघांचे खेळाडू नेट प्रॅक्टीसमध्ये घाम गाळताना दिसत आहेत.
आज आयपीएलमध्ये (IPL 2023) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) आमने-सामने येणार आहेत.
मुंबई आणि बंगळुरु (MI vs RCB) या संघांमध्ये लढत होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा जंगी सामना रंगणार आहे.
अत्यंत चुरशीच्या अशा या लढतीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे.
दोन्ही संघांनी त्यांच्या दहा सामन्यांपैकी प्रत्येकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सध्या गुणतालिकेत बंगळुरु पाचव्या आणि मुंबई आठव्या क्रमांकावर आहे.