Pune News : पाकिस्तानला 'ती' माहिती पुरवली, कुरुलकर हीच का RSS ची शिकवण? राष्ट्रवादीकडून कुरुलकर विरोधात आंदोलन

पुण्यातील डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाकिस्तानकडून झारा दास गुप्ता या बनावट नावाने त्यांच्याशी ऑक्टोबर महिन्यापासून संपर्क साधण्यास सुरुवात झाली

ncp

1/8
पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती देण्याचा आरोप डीआरडीओचे संचालक यांच्यावर आहे.
2/8
कुरुलकर यांनी नक्की कोणती माहिती दिली आणि नक्की कोणता तपास करायचा आहे याची माहिती एटीएसकडून न्यायालयात दिली जाणार आहे.
3/8
त्यापूर्वी पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केलं आहे.
4/8
कुरुलकर यांची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे.
5/8
शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हीच शिकवण आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
6/8
पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. यावेळी कुरुलकर यांच्याविरोधात मोठी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
7/8
कुरुलकर यांच्याकडून कोणती संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्रांना देण्यात आलीय याचा तपास आता एटीएससह देशातील इतर गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत.
8/8
सगळीककडून त्यांचा विरोध केला जात आहे.
Sponsored Links by Taboola