Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Manipur Violence : मणिपूर हिंसाचारात अडकलेल्या 25 विद्यार्थ्यांचं सुखरूप मुंबईत आगमन, विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र सरकारचे आभार
मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 25 विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर या विद्यार्थ्यांना मणिपूर इन्फाळहून आसामच्या गुवाहाटी येथे विशेष विमानाने आणण्यात आले. काल रात्री (8 मे रोजी) विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले आहे.
या मुलांच्या स्वागतासाठी त्यांच्या पालकांसह भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते विमानतळावर आले होते.
राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, राजशिष्टाचार अधिकारी अब्दुल अजीज बेग आणि त्यांच्या टीमने शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांची चौकशी करण्यात आली.
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीच्या परिस्थितीत अडकले असल्याचे समजताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तसेच त्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार हे विद्यार्थी सुखरूप मुंबईत परतले आहेत.
या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण झालेल्या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन वेळीच प्रयत्न केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी देखील महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार मानले आहेत.