Nehal Wadhera : नेहाल वढेराचा दमदार षटकार, थेट स्टेडिअममध्ये उभ्या कारला पडला डेंट
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 199 धावा केल्या. मुंबईने 16.3 षटकांत सहा गडी राखून हा सामना जिंकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यात सूर्यकुमार यादवसोबत नेहाल वढेराने मॅच विनिंग खेळी केली. नेहाल वढेराने 34 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
यावेळी नेहालने एक दमदार शॉट मारला आणि तो थेट स्टेडिअममध्ये उभ्या असलेल्या कारवर आदळला.
नेहाल वढेराने दमदार षटकार लगावला. यावेळी चेंडू थेट बाऊंड्री बाहेर उभ्या असलेल्या कारवर आदळला. यामुळे कारला डेन्ट पडला.
मुंबईच्या फलंदाजीवेळी 11 व्या षटकात नेहाल वढेराने वानिंदु हसरंगाच्या चेंडूवर शानदार शॉट मारला. यावेळी चेंडू थेट बाऊंड्री लाईनच्या बाहेर असलेल्या कारवर आदळला आणि कारला डेन्ट पडला.
दरम्यान, या डेन्टमुळे नुकसान नाही तर फायदा झाला आहे. नेहालने या कारला डेन्ट पाडल्यामुळे आता टाटा कंपनी पाच लाख रुपये दान करणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा मुख्य स्पॉन्सर टाटा आहे. यंदाचा सोळावा हंगाम सुरु होण्यापूर्वी टाटाने घोषणा केली होती की, स्टेडिअममध्ये उभ्या कारवर चेंडू आदळल्यास टाटा पाच लाख रुपये दान करेल. हा निधी कर्नाटकमधील कॉफी बागांमध्ये जैवविविधता वाढवण्यासाठी वापरण्यात येईल.
पदार्पणाच्या सामन्यातच मुंबईच्या 22 वर्षीय नेहाल वढेरा याने सर्वांची मने जिंकली. नेहालने पदार्पणाच्या सामन्यात 13 चेंडूत 21 धावांची प्रभावी खेळी केली. या खेळीपासूनच नेहाल चर्चेत आला.
नेहाल वढेरा मूळचा पंजाबमधील आहे. 4 सप्टेंबर 2000 मध्ये लुधियानात त्याचा सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला होता. त्याला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. याच वर्षी त्याने पंजाबसाठी रणजीमध्ये पदार्पण केले.
पंजाबसाठी त्याने पाच सामन्यात सात डावात 376 धावा केल्या. यामद्ये दोन शतकांचा समावेश आहे. जानेवारी 2023 मध्ये नेहाल याने रणजीमध्ये पंजाबसाठी पदार्पण केले होते.
पदार्पणाच्या सामन्यातच नेहाल वढेरा याने शतकी खेळी केली होती. या सामन्यात नेहाल याने 214 धावांचा पाऊस पाडला होता. फलंदाजीसोबत नेहाल फिरकी गोलंदाजीही करतो.