IPL 2023 Kuldip Yadav : मागील दोन हंगामात बेंचवर, तीन वर्षांची प्रतिक्षा संपली; कुलदीप यादवनं घेतली आयपीएलमधील पहिली विकेट
Kuldip Yadav in IPL 2023 : आयपीएलमधील 37 व्या (IPL 2023) सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) संघाने चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पराभव केला. राजस्थान संघाने 32 धावांनी चेन्नई विरुद्धचा सामना जिंकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यात राजस्थानच्या एका नवख्या गोलंदाजानं सर्वांचं लक्ष वेधलं. राजस्थान रॉयल्समधील वेगवान गोलंदाल कुलदीप यादव यानं चेन्नई विरुद्धच्या सामन्यात तुफान फलंदाजी केली.
राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज कुलदीप यादवनं चेन्नई विरोधातील सामन्यात त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आहे. तीन वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर कुलदीप हा दिवस सोनियाचा ठरला.
शिमरॉन हिटमायरच्या जागी राजस्थान रॉयल्स संघानं कुलदीप यादवला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संधी देण्यात आली आणि त्यानं या संधीचं सोनं केलं. कुलदीपनं तीन षटकांत फक्त 18 धावा देत महत्त्वाची विकेट घेतली.
कुलदीपनं चेन्नईचा फलंदाज शिवम दुबेला जोस बटलरकडून झेलबाद केलं. महत्त्वाचं म्हणजे सलग तीन वर्ष आयपीएलमध्ये सामील होऊनही त्याला ही विकेट घेण्याची संधी मिळाली नव्हती.
कुलदीप यादवनं आयपीएल 2021 मध्ये राजस्थान संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पण तो हा एकच सामना खेळला. त्यानंतर 2023 मधील चेन्नई विरुद्धचा सामना त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील दुसरा सामना आहे.
कुलदीप यादव हा भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवप्रमाणे (Indian Cricketer Kuldeep Yadav) स्पिनर नसून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा वेगवान गोलंदाज आहे. हा कुलदीप यादव डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.
कुलदीप यादवला आयपीएल 2021 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने 20 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. त्याचा हा पहिला आयपीएल हंगाम होता. आयपीएल 2021 मध्ये मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं.
आयपीएल 2022 मध्येही राजस्थान संघानं त्याला खरेदी केलं. पण, या हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर यंदाच्या हंगामातही राजस्थान संघानं कुलदीप यादवला संघात सामील केलं. चेन्नई विरोधातील सामन्यात त्यांला यंदाच्या मोसमातील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली.