PHOTO : सोलापुरात महिलांच्या आरोग्याशी निगडित अनोखं चित्र प्रदर्शन
सोलापूरचे प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात आणि प्रसिद्ध स्त्रीरोग, प्रसुती तज्ज्ञ डॉ. संदेश कादे यांच्या संयुक्त विद्यमाने एका अनोख्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएंडोमेट्रिओसिस या महिलांच्या आरोग्याशी संबंधित आजारावर टाकण्यासाठी सोलापुरात चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मासिक पाळीच्या काळातील स्त्रियांच्या मनातील उलाढाल, आजारपणाच्या काळात अंतरंगात होणाऱ्या वेदना कॅनव्हासवर रेखाटण्याचे काम चित्रकार सचिन खरात यांनी केलं.
भारतातील अनेक महिला या एंडोमेट्रिओसिस या आजाराने ग्रस्त आहेत. मात्र या आजाराची माहिती महिलांना नसल्याने वेळीच निदान होत नाही.
त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. शिक्षण घेणाऱ्या मुलीपासून ते नोकरी करणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांनाच या आजाराचा त्रास होतो.
त्यामुळे याची जनजागृती करण्यासाठी या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करतं असल्याची प्रतिक्रिया डॉ. संदेश कादे यांनी दिली.
तर स्त्रियांच्या वेदना जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने हे चित्रप्रदर्शन पाहिले पाहिजे, अशी भावना चित्रकार सचिन खरात यांनी व्यक्त केली.
दरम्यान सोलापुरातल्या निर्मलकुमार फडकुले सभागृहात 30 एप्रिलपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी दहा या कालावधीत हे प्रदर्शन खुले असेल.
या प्रदर्शनात एकूण 25 चित्रे लावण्यात आली आहेत.
प्रदर्शन झाल्यानंतर ही सर्व चित्रे दुबईच्या सेंटरमध्ये लावण्यात येणार आहेत.