APMC Election : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी (Agricultural Market Committee Election) आज मतदान होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील विविध ठिकाणी बाजार समितीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर नागरिक येत असल्याचे दिसत आहे.
जळगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं चांगली चुरस पाहायला मिळत आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पबोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळालं.
कुठे बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे तर कुठे निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा समना होत आहे.
राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक लागली आहे.