KKR vs SRH Head to Head : कोलकाता आणि हैदराबाद आमने-सामने, कोण ठरणार वरचढ? हेड टू हेड आकडेवारी काय सांगते पाहा...

कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडिअमवर (Eden Gardens Stadium, Kolkata) 14 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता (PBKS vs GT) हा सामना रंगणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोलकाताच्या घरच्या मैदानावर आज हैदराबादची कसोटी पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचा आयपीएल 2023 (IPL 2023) मधील चौथा सामना असेल. आयपीएल 2023 मध्ये गुजरात संघ काहीसा वरचढ दिसत आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांकडून कसून सराव सुरु आहे. सरावादरम्यानचे फोटोही समोर आले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज कोलकाता येथे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा आज चौथा सामना असेल.
यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी कोलकाता संघाने दोन सामने जिंकले तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडे हैदराबाद संघाला तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आतापर्यंत 23 सामने खेळवण्यात आले आहेत.
यामध्ये कोलकाताचं पारड जड दिसून आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स 23 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर, सनरायजर्स हैदराबाद संघाला आठ सामने जिंकता आले आहेत.
दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 180 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हैदराबाद (SRH) आणि कोलकाता (KKR) यांच्यात 14 एप्रिलला रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकातातील ईडन गार्डन स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.