Rabada IPL Record : 64 सामने, 100 विकेट... आयपीएलमध्ये रबाडाची दमदार कामगिरी! लसिथ मलिंगाला टाकलं मागे
Kagiso Rabada fastest To Take 100 Wickets In IPL : आयपीएल 2023 मधील 18 व्या सामन्यात, पंजाब किंग्स (PBKS) संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याने नवा विक्रम रचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरात टायटन्सविरुद्ध (GT) ऋद्धिमान साहाची विकेट घेत रबाडाने एक नवीन विक्रम नावावर केला. आता आयपीएलमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याच्या यादीत रबाडा पहिल्या स्थानावर आहे.
रबाडाने आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात 100 विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम माजी अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावावर होता. (PC : ESPNcricinfo)
आयपीएलच्या 16 व्या मोसमात गुजरात विरुद्धचा सामना रबाडाचा यंदाच्या मोसमातील पहिला सामना होता. कगिसो रबाडाचा आयपीएल टी-20 लीगमध्ये हा 64 वा सामना होता.
या सामन्यात रबाडाने आपल्या 100 विकेट्स पूर्ण केल्या. तो सर्वात जलद 100 विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये 70 डावात विकेट पूर्ण केल्या होत्या. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 81 डावात 100 विकेट पूर्ण घेतल्या आहेत. (PC : ESPNcricinfo)
आयपीएलमध्ये 100 विकेट्स घेण्याच्या कगिसो रबाडाने सर्वात कमी डावात ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याने उर्वरित गोलंदाजांच्या तुलनेत कमीत कमी चेंडू टाकले आहेत.
रबाडाने आयपीएलमध्ये 100 विकेट पूर्ण करण्यासाठी एकूण 1438 चेंडू टाकले आहेत. यामध्ये, लसिथ मलिंगाचे नाव दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने 1622 चेंडूंमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत.
कगिसो रबाडा दक्षिण आफ्रिकन खेळाडू आहे. कगिसो रबाडाने 2018 साली दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं.
रबाडा आयपीएलमध्ये आतापर्यंत 64 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 100 विकेट घेतल्या असून त्याची सरासरी 19.84 आहे. रबाडाची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी करत एका सामन्यात 21 धावांत 4 बळी घेतले होते.