KKR vs SRH : स्टार्कनं वात पेटवली, व्यंकटेश-श्रेयसचा धमाका, शाहरुखच्या केकेआरच्या शिलेदारांकडून हैदराबादची धुळदाण
मिशेल स्टार्कनं आयपीएल क्वालिफायर-1 मध्ये ट्रेविस हेड, नितीश रेड्डी आणि शाहबाज अहमदला बाद केलं. त्यानं 4 ओव्हरमध्ये 34 धावा देत 3 विकेट घेत सनरायजर्स हैदराबादचं कंबरडं मोडलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवरुण चक्रवर्तीनं दोन विकेट घेतल्या. त्यानं हेनरिक क्लासेन आणि भुवनेश्वर कुमारला बाद केलं. क्लासेन 32 धावा करुन बाद झाला. केकेआरच्या विजयाचा वरुण चक्रवर्ती दुसरा हिरो ठरला.
सुनील नरेन यानं बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. त्यानं 4 ओव्हरमध्ये 1 विकेट घेत 40 धावा दिल्या. त्यानं 16 बॉलमध्ये 21 धावांची खेळी केली. रहमतुल्लाह गुरबाज आणि व्यंकटेश अय्यरसोबत त्यानं भागिदारी केली.
व्यंकटेश अय्यरनं शानदा फलंदाजी करत 28 बॉलमध्ये 51 धावा केल्या. नाबाद राहून व्यंकटेश अय्यरनं संघाला विजयापर्यंत पोहोचवलं.
केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं 24 बॉलमध्ये 58 धावा केल्या. श्रेयस आणि व्यकटेश अय्यरनं 97 धावांची भागिदारी केली. केकेआरनं 14 व्या ओव्हरमध्ये 8 विकेट राखून विजय मिळवला.