IPL 2024: आयपीएलचा संपूर्ण हंगाम बेंचवर बसून काढला; एकही सामना न खेळता 5 खेळाडूंनी कोट्यवधी कमावले!
मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सचा प्रवास आयपीएल 2024 पासून संपला आहे. या संघांचे बहुतांश खेळाडू अपयशी ठरले आणि त्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकले नाही. (image credit- ipl)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाखळी फेरीतून बाहेर पडल्यानंतरही या संघांनी अनेक खेळाडूंना संधी दिली नाही ज्यांच्या खरेदीसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. आज आम्ही तुम्हाला अशीच 5 नावे सांगणार आहोत.(image credit- ipl)
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्जने लिलावात 4.2 कोटी रुपये खर्च केले. पंजाब संघाने सुरुवातीपासूनच संघर्ष केला पण वोक्सला एकदाही खेळण्याची संधी दिली नाही.(image credit- ipl)
गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आणि 2023 मध्ये संघ उपविजेता ठरला. पण यावेळी ते गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर राहिले. संघाने आपला ऑफस्पिनर जयंत यादवला एकाही सामन्यात संधी दिली नाही. जयंतला गुजरातने 1.7 कोटी रुपयांना विकत घेतले.(image credit- ipl)
झारखंडचा वेगवान गोलंदाज सुशांत मिश्राला गुजरातने 2.2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. उमेश यादव, मोहित शर्मा आणि संदीप वॉरियरसारखे देशांतर्गत खेळाडूंच्या उपस्थितीमुळे डावखुरा वेगवान गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. शेवटच्या दोन सामन्यांपूर्वी सुशांत दुखापतीमुळे बाहेर होता.(image credit- bcci)
मुंबईचा लेगस्पिनर प्रशांत सोलंकी याला चेन्नई सुपर किंग्जने 1 कोटी 20 लाख रुपयांना विकत घेतले. 2022 च्या मोसमात त्याला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याला दोन हंगामात एकही सामना मिळत नाही. चेन्नईकडे जडेजा, मोईन अली, सँटनर आणि रचिनसारखे फिरकी अष्टपैलू खेळाडू आहेत.(image credit- ipl)
राजवर्धन हंगरगेकर हा देखील चेन्नई सुपर किंग्जचा एक भाग आहे. या मोसमात त्याला एकही सामना मिळाला नाही. चेन्नईकडे वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत. पाथिराना, मुस्तफिझूर आणि दीपक चहर यांना दुखापत झाल्यानंतरही हंगेकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.(image credit- ipl)