KKR vs GT : रोमहर्षक सामन्यात गुजरातकडून कोलकात्याचा पराभव, 'हे' आहेत महत्त्वाचे मुद्दे
आयपीएलच्या आजच्या सामन्यात एक रोमहर्षक लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स संघात पाहायला मिळाली. यावेळी गुजरातने कोलकात्यावर 8 धावांनी विजय मिळवला खरा पण सामना अखेरच्या षटकापर्यंत चुरशीचा झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाने कर्णधार हार्दिकच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते.
ज्यानंतर केकेआर आंद्रे रसेलच्या एकाकी झुंजीच्या जोरावर देखील गुजरात 20 षटकात 148 धावाच करु शकला. ज्यामुळे त्यांचा 8 धावांनी पराभव झाला.
सामन्याचा विचार केल्यास केकेआरचा पराभव झाला खरा पण केकेआरच्या रसेलने केलेल्या अष्टपैलू खेळीची चर्चा सर्वत्रच आहे. त्याने गोलंदाजीत एका षटकात चार विकेट्स घेतल्या. तर 25 चेंडूत 48 धावा केल्या.
सामन्यात सर्वात आधी म्हणजे गुजरातसाठी महत्तपूर्ण खेळी कर्णधार हार्दिकने केली. हार्दिकच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्यासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते.
हार्दिकने 67 धावा केल्या पण त्याला साहाने 25 आणि मिलरने 27 धावांची दिलेली साथही महत्त्वपूर्ण ठरली.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या केकेआरची सुरुवात खराब झाली असून दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्याने त्यांना मोठा तोटा झाला.
केकेआरचे बहुतेक फलंदाज कर्णधार अय्यरसह आज फेल झाले त्यामुळे 157 धावांचे लक्ष्यही त्यांना गाठता आले नाही.
केकेआरची सर्वात मोठी आशा असणाऱ्या रसेलने सामना जिंकवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्याने 25 चेंडूत 48 धावांची खेळी केली खरी पण तो विजय मिळवून देऊ शकला नाही.
उमेश यादवनेही मोक्याच्या क्षणी एक चौकार आणि एक षटकार ठोकला. पण केकेआरचे सुरुवातीचे फलंदाज फेल गेल्यामुळे संघ सामना जिंकू शकला नाही.