IPL 2023, CSK vs KKR : चेन्नई आणि कोलकाता आमने-सामने, सामन्याआधी दोन्ही संघांचा सराव
आज कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर (Eden Gardens Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामन्याआधी दोन्ही संघ जोरदार सराव करताना दिसत आहे. याचे सरावादरम्यानचे फोटोही समोर आले आहेत.
कोलकाताच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ईडन गार्डनवर आज चेन्नई संघाची कसोटी आहे.
कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर नितीश राणाच्या नेतृत्त्वात कोलकाता नाईट रायडर्स संघ आठव्या क्रमांकावर आहे.
आजचा सामना जिंकून कोलकाता आणि चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतील.
चेन्नई सुपर किंग्स घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर आजच्या मैदानात उतरत आहेत. चेन्नई संघाने शेवटच्या सामन्यात एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील हैदराबद संघाचा पराभव केला.
दुसरीकडे, कोलकाता संघाला मागील सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सकडून मागील सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई (CSK) आणि कोलकाता (KKR) या संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं पारड जड आहे.
चेन्नई संघाने 27 पैकी 17 सामने जिंकले असून कोलकाता संघाला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.