डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री फटाक्यांची आतिषबाजी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar Jayanti) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

Dr. Ambedkar Jayanti 2023

1/10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभरात उत्साह पाहायला मिळत आहे. त्यांना अभिवादन करत ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
2/10
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रात्री 12 वाजता नांदेडमध्ये फटाक्यांची आतिषबाजी
3/10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले आहेत. काही ठिकाणी पुस्तक वाचनातून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केलं जात आहे.
4/10
राज्याच्या विविध भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येत आहे.
5/10
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मध्यरात्री ठिकठिकाणी मिरवणूक
6/10
बुलढाण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाचे स्वागत मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीने करण्यात आले.
7/10
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका
8/10
अंबरनाथमध्ये आंबेडकर जयंतीचा उत्साह. रात्री 12 वाजता बाबासाहेबांना अभिवादन अंबरनाथ पालिकेबाहेर शेकडो अनुयायांची गर्दी.
9/10
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कलाकारांनी चित्र रेखाटत डॉ. आंबेडकरांना केलं अभिवादन
10/10
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण, ठिकठिकाणी आतिषबाजी
Sponsored Links by Taboola