जोस बटलरची फिल्मी लव्हस्टोरी
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आज आयपीएल 2022 ची फायनल होणार आहे. गुजरात आणि राजस्थान यांच्यामध्ये अटीतटीची लढाई होईल... या निर्णायक सामन्यात जोस बटलर पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाजी करण्यास सज्ज झालाया...याच जोस बटलरची लव्ह स्टोरी एकाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबटलरची पत्नी लुइसने एका मुलाखतीत सांगितले की, त्यांची लव्हस्टोरी शाळेत असताना सुरु झाली.. 14 वर्षांपासून ते दोघे चांगले मित्र होते.. त्यानंतर मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले.. काही वर्ष डेट केल्यानंतर लग्न केले. बटलर म्हणाला होता की, पत्नी लुइस शाळेत असताना खूप ढ होती. माझा होमवर्क कॉपी करत होती.. यामध्ये दोघांमध्ये मैत्री वाढली..त्याचं रुपांतर प्रेमात जाले... बटलर म्हणाला की, 15 व्या वर्षांपासून लुईसला पत्नी म्हणून बोलवत होतो. हे ऐकून लुईस लाजत होती.
शाळेत होते.. तेव्हांपासून दोघे एकमेंकाना ओळखत होते.. त्यामुळे डेटिंगमध्ये जास्त वेळ घालवला नाही.. दोघांनीही आपापल्या करिअरवर फोकस केले.. जोस शिक्षणासोबतच क्रिकेटही खेळत होता.. त्यामुळे लुईसला जास्त वेळ देता येत नव्हता.. शाळेतून बाहेर आल्यानंतर आम्ही डेट करायला सुरुवात केल्याचं लुईसने सांगितले... त्याचवेळी बटलरने क्रिकेटवर फोकस करण्यास सुरुवात केली होती.. जोस क्रिकेटमध्ये करिअर कऱण्यास यशस्वी झाला. त्यानंतर एकमेंकाना वेळ देण्यास सुरुवात केली. 2017 मध्ये दोघांनी लग्न केले.
बटलरने सांगितले की, पत्नी लुईस त्याला नेहमीच सपोर्ट करत होती.. क्रिकेटमुळे बटलरला पत्नी लुईसला जास्त वेळ देता येत नाही. पण जेव्हा जेव्हा विदेश दौऱ्यावर जातो, तेव्हा तेव्हा पत्नी आणि मुलांना सोबत घेऊन जातो... लग्नाला पाच वर्षांपेक्षा जास्त वेळ जालाय... बटलर आणि लुईस यांनी दोन मुली आहेत. त्यांची नावे जॉर्जिया आणि मॅगी आहे.
लुइसने एका मुलाखतीत सांगितले की, बटलर माझा आणि मुलींची खूप चांगली काळजी घेतो.. चांगल्या क्रिकेटटरसोबत तो चांगला नवरा आणि बापही आहे. तर बटलरच्या मते लुइस त्याची बेस्ट पार्टनर आहे. लुइस जेव्हा जेव्हा सोबत असते तेव्हा तेव्हा सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करतो.
जोस बटलरची पत्नी लुइस फिटनेस ट्रेनर आहे. लुइस पतीसोबत सोशल मीडियावर फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असते. त्याशिवाय जोस बटलरसोबत अनेक क्रिकेट सेरेमनीमध्ये दिसून आली आहे.